प्रतिनिधी/ बेळगाव
राखी पौर्णिमेनिमित्त मराठा लाईट इन्फंट्री येथे इनरव्हील क्लबच्या पुढाकाराने जवानांना राखी बांधण्यात आली. 227 विद्यार्थी, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व इनरव्हील यांच्यावतीने अग्निवीरांच्या मनगटांवर राखी बांधण्यात आली. अग्निवीरांनी अत्यंत अभिमानाने ही राखी बांधून घेतली व मातृभूमीचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी अधोरेखित केली.
अग्निवीर किंवा जवानांना आपले प्रशिक्षण आणि जबाबदारी सोडून प्रत्येक सणांवेळी आपल्या घरी जाणे अशक्य असते. हे लक्षात घेऊन त्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.









