ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैद्यांना आता महिन्यातून 3 वेळा घरी फोन करता येणार आहे. कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अपर पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड फोन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकेतच्या दृष्टीने महिन्यातून 3 वेळा येथील कैद्यांना घरी फोन करता येईल. पुण्यातील येरवडा कारागृहात सुरू करण्यात आलेला हा प्रायोगिक प्रकल्प जर यशस्वी झाला तर राज्यातील इतर कारागृहात हा सुरू करण्यात येईल, असेही गुप्ता यांनी यावेळी सांगितले.








