वृत्तसंस्था / हाँगकाँग
जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाला पाठदुखापतीची समस्या सुरू झाल्याने तिला आता डब्ल्युटीए टूरवरील 2024 च्या टेनिस हंगामातील उर्वरित स्पर्धांना मुकावे लागणार आहे. येथे 28 ऑक्टोबरपासून हाँगकाँग खुली महिलांची टेनिस स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेत ओसाका सहभागी होवू शकणार नाही.
तीन आठवड्यापूर्वी झालेल्या चायना खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत अमेरिकेच्या कोको गॉफने ओसाकाला पराभूत केले होते. यानंतर तिला वारंवार दुखापतीने हैराण केले आहे.









