वृत्तसंस्था / लंडन
गुरुवारी झालेल्या एकदिवशीय मालिकेतील पहिल्या सामन्यात बोट मोडल्याने जेमी ओव्हरटनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित एकदिवशीय आणि टी-20 सामन्यांमधून बाहेर पडावे लागले आहे.
एजबॅस्टन येथे इंग्लंडच्या 238 धावांच्या विजयात सुरूवातीला स्वताच्याच गोलंदाजीवर रिटर्न कॅच घेण्याच्या प्रयत्नात त्याच्या उजव्या हाताची करंगळी मोडली. ओव्हरटनने त्याचा हात धरला आणि लगेच ड्रेसिंग रुममध्ये धावाला. काही उपचारानंतर तो परतला आणि त्याने 3-22 अशी कामगिरी केली.. आता तो इंग्लंडच्या वैद्यकीय संघाच्या देखरेखीखाली पुनर्वसन कालावधीतून जाईल. असे इंग्लंड क्रिकेटने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे. एकदिवशीय संघात कोणताही बदली खेळाडू जोडला जाणार नाही. सप्टेंबर 2023 नंतर इंग्लंड रविवारी कार्डिफमध्ये पहिला एकदिवशीय द्विपक्षीय मालिका विजय मिळवू शकतो. तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी ओव्हल येथे आहे. पुढील शुक्रवारपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे.









