बेळगाव :
गणेबैलजवळ दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या हावळनगर, पहिला क्रॉस, मच्छे येथील एका युवकाचा खासगी इस्पितळात मृत्यू झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
जोतिबा गोविंद गावकर (वय 35) असे त्याचे नाव आहे. 9 फेब्रुवारी रोजी गणेबैलजवळ अपघातात जोतिबा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. सोमवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा. रक्षाविसर्जन होणार आहे.









