लोकांच्या हार्टरेटचे करणार निरीक्षण
टॅटूला कलेतील सर्वात जुन्या स्वरुपांपैकी एक मानले जाते. मानवी इतिहासात टॅटूसंबंधी अनेक संस्कृतींकडून याचा अभ्यास केला जात राहिला आहे. आता टॅटूचे नवीन स्वरुप चिन्हांपेक्षा अधिक प्रगत असणार आहे. हा नवा टॅटू मानवी आरोग्यावर नजर ठेवण्यास मदत करणार आहे.
वैज्ञानिकांकडून आता इंजेक्टेबल स्मार्ट टॅटू तयार केला जात आहे. या टॅटू त्वचेखाली इंजेक्ट केला जाऊ शकतो. यासाठी टॅटूच्या जुन्या पारंपरिक शाईयुक्त पद्धतीलाही बदलले जाऊ शकते असे संशोधकांचे सांगणे आहे.

या नव्या प्रकारच्या स्मार्ट टॅटूमुळे मधुमेहाने ग्रस्त रुग्णांमधील रक्तशर्करेचे प्रमाण जाणून घेणे, हृदय किंवा किडनीच्या कार्यांवर देखरेख इत्यादी कार्ये केली जाऊ शकतात. तसेच आरोग्याच्या निर्धारित मापदंडांमध्ये बदल झाल्यावर हा टॅटू इशारा देणार आहे.
अशाप्रकारचे नवे संशोधन दैनंदिन वापरात आणले गेल्यास मोठा लाभ होणार आहे. यात प्रत्यारोपण योग्य आणि इंजेक्टेबल सेंसरची एक विस्तृत साखळी सामील असून ती वास्तविक वेळेत मानवी स्थितीच्या अहवालाला प्रदर्शित करण्यास उत्तमप्रकारे कार्य करू शकते असे संशोधक डॉ. अली यतिसेन यांनी म्हटले आहे.
इंपीरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये केमिकल इंजिनियरिंग विभागाचे संशोधक डॉ. अली यतिसेन यांच्यानुसार स्मार्ट टॅटू पिगमेंटमुळे मानवी शरीरात काही बायोमार्कच्या देखरेखीसाठी इंजेक्ट केले जाऊ शकतात. याकरता इंजिनियर, वैज्ञानिक आणि डिझायनर्समध्ये ताळमेळ असणे आवश्यक आहे.









