पालकमंत्री नीतेश राणे यांचे गौरवोद्गार; कुडाळला जेष्ठ नागरिकांचा जिल्हा मेळावा ; जिल्हा पोलीस प्रशासनाचे आयोजन
कुडाळ
ज्येष्ठ मंडळींसाठी हेल्पलाइन क्रमांक आणि अन्य सुविधा देणारा हा सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. संकटकाळी पोलिसाना फोन केला, तर निश्चितच मदत मिळते हा विश्वास पोलिसांबद्दल आहे.तो विश्वास अधिक घट्ट करणारा हा आजचा कार्यक्रम आहे, असे गौरवोद्गार मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे शनिवारी दुपारी ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात काढले. पोलिसांनी येथील जनतेबरोबर चांगले वागले पाहिजे.आपल्याकडे येणारी व्यक्ती समाधानी झाली पाहिजे.यासाठी आपलीं जबाबदारी समजून काम करा ,असे श्री राणे यानी सांगून या जिल्ह्यात विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे असून त्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे,असे त्यांनी सांगितले. या ज्येष्ठ नागरिक मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला.सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जेष्ठ नागरी मेळावा व ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन क्रमांक 7036606060 लोकार्पण सोहळा आज कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री राणे होते.कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, पद्मश्री परशुराम गंगावणे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा समन्वयक सिताराम उर्फ दादा कुडतडकर आदी मान्यवर तसेच पोलीस अधिकारी – कर्मचारी , पोलीस पाटील उपस्थित होते. डिज हजाराराहुन अधिक ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.श्री राणे म्हणाले, विश्वासार्हता मिळविणे पोलीस खात्याला फार गरजेचे आहे. कारण कुठलीही घटना घडली तर लोक राजकीय कार्यकर्ते लोकप्रति त्यांच्याबरोबर पोलिसांनाही संपर्क साधतात. आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे . येथील लोकांची सकारात्मक मानसिकता आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आंबा, काजू या आधारावर जगणारी येथील जनता आहे. या लोकांकडे पाहताना पोलीस प्रशासन थोडा वेगळा दृष्टिकोन असावा ,असे त्यांनी सांगितले. विकासात्मक चालना देणारी या जिल्ह्याची प्रतिमा आहे. साक्षरतेमध्ये आपला जिल्हा पुढे आहे. विकास आम्हाला हवा आहे. त्याला प्रोत्साहन , पाठिंबा देत उभी राहणारी लोक आहेत.म्हणून लोकांच्या गरजा व क्राईम आहेत.त्या दृष्टीकोनातून समजून घेतले, तर पोलीस प्रशासन अधिक प्रभावी काम करू शकते,असे सांगून पोलीस प्रशासनाने आपल्याकडे आलेली व्यक्ती समाधानी होऊन गेली पाहिजे.असे काम केले तर या हेल्पलाईन नंबर योजनेचा उपयोग होईल त्यासाठी पोलीसांनी आचारसंहिता लावून घ्यावी, अशी अपेक्षा श्री राणे त्यांनी व्यक्त करून ग्रामसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अग्रवाल ग्रामीण भागात जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत.त्याचे त्यांनी कौतुक केले.ऑनलाईन ट्रेनिंग,अमली पदार्थ या मुळे तरुण पिढीचे भविष्य अंधारात चालले आहे.यात पोलीस विभागाने लक्ष घालावे.पोलीस अधिकाऱ्यांनी आपापला भाग सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच अमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी सतर्कतेने काम केले पाहिजे. त्यासाठी महत्त्वाची मोहीम राबवावी लागेल, याकडे राणे यांनी श्री दराडे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.श्री दराडे यांनी तुमच्यासाठी सिंधुदूर्ग पोलिसांचे 24 तास दरवाजे उघडे आहेत.या हेल्पलाईनवर आमचा कर्मचारी 24 तुमच्या सेवेसाठी असणार आहे.पोलीस विभागा व्यतिरिक्त आरोग्य,पाणी संबधित समस्या असेल तरीही तुम्ही या हेल्पलाईन वर संपर्क साधा, असे आवाहन त्यांनी केले.दीपक केसरकर ,वृंदा कांबळी ,भालचंद्र मराठे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक श्री अग्रवाल , सूत्रसंचालन अमर प्रभू यांनी केले,तर आभार कृषिकेश रावले यांनी मानले.









