वृत्तसंस्था / कॅनेस (फ्रान्स)
येथे झालेल्या कॅनेस आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रॅन्डमास्टर पा इंनियानने आपल्याच देशाच्या व्ही. प्रणेशचा नवव्या आणि शेवटच्या फेरीतील डावात पराभव करत जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत नवव्या फेरीअखेर इनियानने 7.5 गुणांसह आघाडीचे स्थान घेत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. दिल्लीचा आंतरराष्ट्रीय मास्टर्स आराध्य गर्गने 7 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. या स्पर्धेत विश्वकनिष्ट गटातील विद्यमान विजेता कझाकस्थानच्या नोडेरबेकने तिसरे स्थान पटकाविले. या स्पर्धेत भारतीय ग्रॅन्डमास्टर्स इलियानने 6 डाव जिंकले असून तीन डाव बरोबरीत सोडले. इनियानने या स्पर्धेतील जेतेपदाबरोबरच 12 रेटिंग गुण मिळविले आहेत. आता तो 2579 रेटिंग गुण घेत 2600 इलो रेटिंग गुणाच्या समिप पोहोचला आहे. या स्पर्धेमध्ये 25 देशांचे सुमारे 147 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.









