कोल्हापूर / संग्राम काटकर :
कोल्हापुरातील क्रीडा प्रबोधिनीमधून पुण्यातील बालेवाडीत हलवलेल्या फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र तब्बल 25 वर्षांनी पुन्हा क्रीडा प्रबोधिनीला मिळाले आहे. या निमित्ताने क्रीडा प्रबोधिनीकडे फुटबॉल प्रशिक्षण केंद्र आणण्यासाठी गेली वर्षभर शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता फुटबॉल प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सराव करणाऱ्या 14, 17 व 19 वर्षाखालील मुला–मुलींसाठी लवकरच शासनाकडून इफ्रास्ट्रक्चर उभारले जाईल. आणि बदलेल्या फुटबॉलनुसार शास्त्राsक्त पद्धतीने खेळाडू तयार करण्याचा नवा अद्याय केंद्रात सुरु होईल. शिवाय केंद्रासाठी निवडल्या जाणाऱ्या राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून मिळणाऱ्या प्रशिक्षणातून तयार झालेले खेळाडू फुटबॉल संघांना मिळण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत तर थेट महाराष्ट्र संघातून खेळण्याची खेळाडूंना संधी मिळणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 1996 साली कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये क्रीडा प्रबोधिनी स्थापन केली. त्यात कुस्ती, नेमबाजी, फुटबॉलचे निवासी प्रशिक्षण केंद्रे सुरु केले. स़्टेडियममध्ये फुटबॉलचा सरावही सुरु झाला. मात्र जम बसायच्या आतच 2000 साली फुटबॉल प्रशिक्षण बालेवाडीत (पुणे) हलवले. केंद्र हलवताना कोल्हापुरातील शिवाजी स़्टेडियममध्ये फुटबॉलचा सराव करताना खेळाडूंना अडचणी येतात, स्टेडियममध्ये जास्त खेळाडू निवास करतील अशी व्यवस्थाही नाही, अशी कारणे दाखवली. दुसरीकडे क्रीडा प्रबोधिनीकडे फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र परत आणण्यासाठी कोल्हापुरात प्रयत्नही झाले नाहीत.
गतवर्षी क्रीडा प्रबोधिनीकडे पुन्हा फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र खेचून आणण्यासाठीची कोल्हापुरात अचानक ठिणगी पडली. क्रीडा संघटना, ज्येष्ठ फुटबॉलपटूंनी केंद्र सुऊ करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुऊ केला. गतवर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतही फुटबॉल केंद्र सुऊ करण्याबाबतच्या भावना उमटल्या. शिवाजी पेठेतील बीजीएम स्पोर्टस्, मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीमने तर फुटबॉल प्रशिक्षण केंद्र क्रीडा प्रबोधिनीकडे खेचून आणण्यासाठी कोल्हापूरकरांनो एकत्र या, अशी हाक देणारे फलकच मिरवणुकीत आणले होते. विधानसभेच्या धामधुमीमुळे क्रीडा प्रबोधिनीकडे फुटबॉल प्रशिक्षण केंद्र येईल, की नाही हा विषयच बारगळला होता.
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रीडा प्रबोधिनीत फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र सुऊ करण्याला तत्वत: मान्यता देऊन कोल्हापूरकरांना खूष केले आहे. आता प्रशिक्षण केंद्र उभारताना जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित असलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियम अथवा छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाचा विचार केला जाणार आहे. यासंदर्भात शासनाच्या क्रीडा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, केंद्रात फुटबॉलचे प्रशिक्षण घेणारे किती खेळाडू असावेत हे सर्वात आधी ठरवले जाईल. त्यांची निवास–भोजनाची सोय, बदलेल्या फुटबॉलनुसार सरावासाठी दर्जेदार मैदान करणे, राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या नेमणुका करणे, खेळाडूंचे शिक्षण, आरोग्य, मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करणे आदी सोयी–सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष पाऊले उचलली जातील. तसेच लवकरच फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुऊ करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, क्रीडा अधिकारी, लोकप्रतिनिधी व शासनाच्या क्रीडा विभागातील अधिकारी यांच्यात बैठका घेतल्या जातील. या बैठकांमध्ये जे निर्णय होतील, त्याची अंमलबजावणी करण्यावरही भर दिला जाईल हे खुद्द अधिकाऱ्यांकडूनच सांगण्यात आले आहे. उशिराने का होईना परंतू आता कोल्हापुरात फुटबॉलपटू घडण्याचा नाव अध्याय सुऊ होतोय हे क्रीडानगरी कोल्हापूरची एक जमेची बाजू असणार आहे.
- वसतीगृह बांधावे लागले…
क्रीडा प्रबोधिनीचे छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये कार्यालय आहे. कार्यालयातील दोन हॉलमध्ये 30 ते 35 खेळाडूच राहू शकतात. सध्या हॉलमध्ये कुस्तीचे 9 व नेमबाजी 2 खेळाडू निवास करत सराव करताहेत. प्रबोधिनीत फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुऊ झाल्यानंतर प्रवेश घेणाऱ्या खेळाडूंची निवासाची व्यवस्था करणे कठीण जाईल. विभागीय क्रीडा संकुलाला वसतीगृह मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे लवकर निधी मिळवून वसतीगृह बांधले तर मात्र खेळाडूंची निवासाची सोय चांगली होईल.
–सचिन चव्हाण (प्राचार्य व तालुका क्रीडा अधिकारी–क्रीडा प्रबोधिनी)
- लवकर मैदानाची पाहणी करणार…
क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्र सुऊ करण्यासाठी शासनाच्या क्रीडा विभागातील अधिकारी लवकरच कोल्हापूरात येतील. हे अधिकारी छत्रपती शिवाजी स्टेडियम व छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी कऊन खेळाडूंसाठी सोयी–सुविधा उपलब्ध करण्याचा आराखडा तयार करतील, असे शासनाच्या क्रीडा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.








