मुंबई
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचा समभाग सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या घसरणीत असताना दिसला. त्याचा परिणाम शेअरबाजारावरही दिवसभर दिसून आला. इन्फोसिसचा समभाग 15 टक्के इतका घसरत सोमवारी शेअरबाजारात 1185 रुपयांवर खाली आला होता. इन्फोसिसने मार्च 2023 संपलेल्या तिमाहीत 6128 कोटी रुपयांचा नफा नोंदला असून जो अंदाजापेक्षा कमी नेंदल्याने समभागाचा भाव बाजारात घसरल्याचे सांगितले जात आहे.









