मुंबई
गेले काही दिवस आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे समभाग दबावामध्ये व्यवहार करीत होते. मात्र हा दबाव झुगारून कंपनीचा समभाग आता तेजीकडे प्रवास करताना दिसतो आहे. 52 आठवडय़ाच्या निच्चांकी भावानंतर कंपनीचा समभाग 14 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या काही कालावधीत इन्फोसिसने 3 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिकची 32 हून अधिक कंत्राटे मिळवली आहेत. बुधवारी 0.71 टक्के इतका समभाग वाढत 1550 रुपयांवर पोहोचला होता.









