महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आंबोलीत माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी
आंबोली,चौकूळ व गेळे येथील कबुलायतदार जमिनींवरील वन विभागाची नोंद रद्द करून सदर जमिनी लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंबोली येथे दिली. बावनकुळे खासगी दौऱ्यासाठी आंबोलीत आले असता आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी कबुलायतदार जमीन प्रश्न 30 वर्षे प्रलंबित राहिल्यामुळे ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबतचे निवेदन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. यावेळी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर,आंबोली प्रमुख गावकर श्री शशिकांत गावडे , आंबोली तंटामुक्ती अध्यक्ष श्री उल्हास गावडे ,प्रांताधिकारी हेमंत निकम , तहसीलदार श्रीधर पाटील , सर्कल श्री यादव , तलाठी मुळीक व इतर महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.









