आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांच्या हस्ते अनावरण
बेळगाव : अवयवदान दिनाचे औचित्य साधून शनिवारी क्युआर कोड अनावरण करण्यात आला. अवयवदानाविषयी संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी हा क्युआर कोड तयार करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांच्या हस्ते बेळगाव येथे पोस्टर तसेच क्युआर कोडचे अनावरण करण्यात आले. रोटरी क्लबच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून अवयवदानाविषयी जनजागृती केली जात आहे. अवयवदान करणाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी विशेष उपक्रम राबविले जात असल्याबद्दल दिनेश गुंडूराव यांनी रोटरीच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, केपीसीसीचे जनरल सेक्रेटरी सुनील हम्मन्नावर, रोटरीचे नरसिंह जोशी, आमदार राजू सेठ, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोनी यासह इतर उपस्थित होते.









