प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक सरकारकडून या ना त्या माध्यमातून कन्नड सक्ती लादली जात आहे. यामुळे मराठी भाषिकांनी दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण होत असून ही गळचेपी थांबविण्यासाठी म. ए. समितीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत भेट घडवून आणावी व त्यांना येथील परिस्थितीची जाणीव करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंके यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली.
शनिवारी कॅम्प येथे नगरसेवक रवी साळुंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन महापालिकेत मराठी भाषेची होणारी गळचेपी याची थोडक्यात माहिती दिली. शरद पवार यांनी महापालिकेतील कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच सीमाप्रश्नासंदर्भात आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले.









