ऑनलाईन टीम
लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज आत्मविश्वासाने मैदानात उतरली. मात्र, पराभवातून सावरत इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार पुनरागमन केले. पहिल्या डावात ब्रिटिश गोलंदाजांनी भेदक मारा करत भारतीय संघाचा ७८ धावांत खुर्दा उडवला. रोहित शर्मा १९ (१०५ चेंडू) आणि अजिंक्य रहाणे १८ (५४ चेंडू) वगळता एकाही खेळाडूला दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला. जेम्स अँडरसनने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले. त्याने के.एल. राहुल (०), पुजारा (१) आणि विराट कोहली (७) यांना माघारी धाडले. त्यानंतर रॉबिन्सन, सॅम करन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी भारताच्या डावाला खिंडार पाडले. ब्रिटिश गोलंदाजांच्या माऱ्यापुढे टीम इंडियाचा डाव ४०.४ षटकांत अवघ्या ७८ धावांवर गुंडाळला.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. पहिल्या दोन सामन्यात भारत १-० ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला असून लॉर्ड्स कसोटीत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









