ऑनलाईन टीम
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच कसोटीत भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशातच भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली असून त्याला उर्वरित मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता शमी पुढील तीन कसोटीत दिसणार नाही.
अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शमी फलंदाजी करत होता. यावेळी पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू जोरात शमीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला. मार जोरात लागल्याने शमीला हात उचलणंही अवघड झाले होते. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीनेही शमीला खूप वेदना होत असल्याचे सांगितले. तसेच त्याला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचेही विराटने सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









