सीईओ अरुण मिश्रा यांची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिंदुस्थान झिंक ही कंपनी औद्योगिक ई-कचरा पुनर्वापराची योजना आखत आहे. वेदांत-प्रवर्तित हिंदुस्थान झिंक पुनर्वापर क्षेत्रात संधी शोधण्याची योजना आखत आहे. त्यामध्ये औद्योगिक अवशेष आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून धातू काढणे याचादेखील समावेश राहणार आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हिंदुस्थान झिंक लिमिटेडचे सीईओ अरुण मिश्रा म्हणाले, ‘पुढे जाऊन, जगातील सर्वात मौल्यवान कंपन्या त्या असतील ज्या रिसायकलिंग व्यवसायात आहेत.’
रिसायकलिंगसाठी तिसऱ्या प्रस्तावित स्वतंत्र व्यवसाय युनिटबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. गेल्या महिन्यात हिंदुस्थान झिंकने सांगितले होते की ते झिंक, शिसे, चांदी आणि रीसायकलिंगमध्ये त्यांचे व्यवसाय युनिट वेगळे करण्याच्या संभाव्य पर्यायांचा विचार करणार आहेत.
ई-कचऱ्यातून सोने, चांदी शोधण्याचा प्रयत्न : मिश्रा
मिश्रा म्हणाले, ‘ई-कचऱ्यातून सोने, चांदी आणि तांबे काढण्यास काही वाव आहे का ते आम्ही पाहत आहोत.’ ते म्हणाले की, कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रात विदेशी कंपन्यांशी भागीदारी करण्याच्या शक्यतेचा शोध घेईल. कंपनीने गुंतवणुकीचा आकडा किंवा इतर क्षमता विस्ताराचा तपशील मात्र दिलेला नाही.









