मुंबई :
खाजगी क्षेत्रातील बँक इंडसइंड बँकेने 30 जूनअखेरचा आपला नफ्याचा अहवाल नुकताच सादर केला आहे. या अंतर्गत कंपनीने 30 जून 2023 ला संपलेल्या तिमाहीमध्ये 32 टक्के इतका नफा वाढीव प्राप्त केला आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत बँकेने 2124 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेच्या एकंदर उत्पन्नामध्ये वर्षाच्या आधारावर पाहता 18 टक्के वाढ दिसून आली असून उत्पन्न 4867 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.









