देशातील सर्वोत्तम शाळेच्या यादीत मिळाले स्थान
प्रतिनिधी/ बेळगाव
इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूल (आयएआयएस) ने भारतातील सर्वोत्तम शाळांच्या यादीत स्थान मिळविले आहे. प्रतिष्ठित सीफोर स्कूल रँकिंग सर्व्हे 2024 मध्ये अग्रक्रम मिळविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. ही शाळा भारतातील सर्वोत्तम प्रमुख शिक्षण संस्थांमध्ये गणली जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर तिसरा, कर्नाटकात दुसरा तर बेळगावमध्ये पहिला क्रमांक मिळवून शाळेने उल्लेखनीय यश मिळविले आहे.
सर्वोत्तम शिक्षण, सर्वांगीण विकास, विचारक्षम विद्यार्थी घडविले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, सहानुभूती, शिस्त व आदर ही मूल्ये खोलवर रुजविली जात आहेत. तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम शिकविला जातो. विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम न करता त्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये तो यशस्वी व्हावा यासाठी मार्गदर्शन केले जाते.
शाळेचे सीईओ व एमडी निवृत्त लेफ्टनंट जनरल अर्जुन राय (पीव्हीएसएम, व्हीएसएम) व प्राचार्या डॉ. प्रसिधा श्रीकुमार यांनी 11 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारला. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व पालकांनी दिलेल्या योगदानामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.









