नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; विशाल मित्रमंडळ व भाजपचे आवाहन
कुडाळ प्रतिनिधी
भाजपचे युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्ताने विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याचा प्रसिद्ध कीर्तनकार ह . भ. प इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन सोहळ्याने कुडाळ येथे श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ह. भ . प इंदुरीकर महाराज उपस्थित राहणार आहेत . या शुभारंभ सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे आधी नेते उपस्थितीत राहणार आहेत . विशाल परब अभिष्टचिंतन सोहळ्याचे खास आकर्षण इंदुरीकर महाराज आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ह. भ . प इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होत असून हे किर्तन ऐकण्यासाठी वारकरी सांप्रदाय तसेच सर्व स्तरातील अध्यात्मिक तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्वांनी या अभिष्टचिंतन शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विशाल परम मित्र मंडळ व भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.









