प्रतिनिधी/ बेळगाव
केएलएस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) तर्फे इंडक्शन प्रोग्रॅम जेनिसीस-2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन विद्यार्थ्यांना कॉलेजच्या वातावरणाची ओळख करून देणे, बीसीए अभ्यासक्रमाबाबत माहिती देणे, तसेच सहकारी विद्यार्थ्यांची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ यांनी, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान व गुणांवर लक्ष केंद्रित न करता कौशल्य वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. प्रा. सुप्रिया बाळेकुंद्री यांनी बीसीए अभ्यासक्रम व संस्थेचा आढावा घेतला. प्रा. वैशाली शानभाग यांनी उपस्थितांना शपथ दिली. सागर हुलबत्ते यांनी प्लेसमेंटविषयी माहिती दिली. बीसीएच्या समन्वयक डॉ. अस्मिता देशपांडे यांनी स्वागत केले.









