ऑनलाईन टीम/तरुण भारत
शीना बोरा हत्येप्रकरणी साडेसहा वर्षांपासून जेलमध्ये असणाऱ्या इंद्राणी मुखर्जी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या भायखळा महिला तुरुंगात असणाऱ्या इंद्राणी मुखर्जी अखेर जेलबाहेर आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानंतर आता सीबीआय विशेष न्यायालयानेही गुरुवारी त्यांना २ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केल्यांनतर आज त्या जेलमधून बाहेर आल्या. जेलबाहेर येताच इंद्राणी मुखर्जी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
इंद्राणी मुखर्जी जेलमधून बाहेर आल्यानंतर प्रथम त्यांनी आपल्या वकिलाला मिठी मारली. यांनतर त्या गाडीत बसल्या. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जेलमधून बाहेर आल्याने आपण खूप खुश असल्याचे सांगितले.
दरम्यान, इंद्राणी मुखर्जींना जमीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना लागू असणारे नियम त्यांचा पती पीटर मुखर्जीलाही लागू असतील असे स्पष्ट केले आहे. कोर्ट म्हणाले -“आरोपी इंद्राणी मुखर्जी तात्पुरती रोख रकम देण्यास तयार आहे. २ लाख रुपयांचा जातमुचलका जमा केल्यानंतर त्यांची सुटका केली जाईल. त्यांना २ आठवड्यांचा जामीन मंजूर करण्यात आला असून, त्याचा अवधी आजपासून सुरू होईल.”