ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुत्रप्राप्ती संदर्भात केलेल्या विधानानंतर दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे वादग्रस्त विधान इंदोरीकर महाराजांनी एका किर्तनात केले होते. याप्रकरणी इंदोरीकर महाराजांवर गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा रद्द करावा, यासाठी इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यांनी दाखल केलेली याचिका आज न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालणार आहे, असे वकील रंजना गवांदे यांनी सांगितले.








