वृत्तसंस्था / चेन्नई
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या चेन्नई खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इंडोनेशियाची 23 वर्षीय महिला टेनिसपटू जेन्सी जेनने एकेरीचे जेतेपद पटकाविले. तब्बल 23 वर्षानंतर पहिल्यांदाच डब्ल्यूटीए टूरवरील एकेरीची जेतेपद मिळविणारी जेन्सी ही इंडोनेशियाची पहिली टेनिसपटू आहे.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जेन्सीने ऑस्ट्रेलियाच्या किंबर्ली बिरेलचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले. या जेतेपदामुळे महिला टेनिसपटूंच्या क्रमवारीत जेन्सीने 53 वे स्थान मिळविले आहे.









