वृत्तसंस्था/ जकार्ता (इंडोनेशिया)
इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा आज मंगळवारपासून येथे सुरू होत असून आघाडीची भारतीय पुऊष जोडी सात्विकसाईराज रान्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे लक्ष त्यात वर्षातील पहिले विजेतेपद मिळविण्याकडे असेल, तर लक्ष्य सेन हंगामाची निराशाजनक सुऊवात मागे टाकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
मलेशिया ओपन सुपर 1000 आणि इंडिया ओपन सुपर 750 या मागील दोन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठणारी सात्विक आणि चिराग ही जागतिक क्रमवारीतील 9 व्या क्रमांकाची जोडी सध्या चांगलीच फॉर्मात आहे.सात्विक-चिराग यांना दोन उपांत्य फेरीत सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे आणि या स्पर्धेत त्यांचे लक्ष्य उपांत्य फेरीच्या पार जाण्याचे असेल. ते चिनी तैपेईच्या चेन झी-रे आणि यू चिह लिन यांच्याकडील लढतीने आपल्या मोहिमेची सुऊवात करतील.
मात्र, भारताचे एकेरीतील खेळाडू सेन आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासमोरील आव्हान मोठे असेल. गतवर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या 23 वर्षीय सेनला गेल्या दोन आठवड्यांत पहिल्या फेरीत दोनदा पराभव पत्करावा लागलेला आहे. तो यावेळी आपले सर्वोत्तम प्रदर्शन घडविण्याच्या निर्धाराने उतरेल, तर प्रियांशू राजावत जपानच्या कोडाई नाराओकाविऊद्धच्या सामन्याने सुऊवात करेल. पुऊष एकेरीतील अन्य दोन भारतीयांचा पात्रता फेरीत एकमेकांशी सामना होणार असून किदाम्बी श्रीकांत, जो इंडिया ओपनमध्ये खेळू शकला नाही, तो किरण जॉर्जला मागे टाकण्याचा प्रयत्न करेल.
महिला एकेरीच्या 32 खेळाडूंच्या फेरीत सिंधूची सुऊवात चिनी तैपेईच्या सुंग शूओ युनविऊद्धच्या सामन्याने होईल, तर आकार्षी कश्यपचा सामना जपानच्या जागतिक क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर असलेल्या नोझोमी ओकुहारा आणि अनुपमा उपाध्यायचा सामना स्थानिक खेळाडू ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगशी होईल. महिला एकेरीच्या पात्रता फेरीत इशारानी बऊआचा सामना रक्षिता रामराजशी होईल, तर तान्या हेमंत चिनी तैपेईच्या तुंग सिओ-टाँगला भिडणार आहे. तनीषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा यांची महिला दुहेरीतील मोहीम थायलंडच्या ऑर्निचा जोंगसाथापोर्न आणि सुकिता सुवाचाई यांच्याविऊद्ध सुरू होईल. मिश्र दुहेरीत तनीशा ध्रुव कपिलासोबत इंडोनेशियाच्या अदनान मौलाना आणि इंदाह काह्या सारी जमील यांच्याविरुद्ध लढेल, तर रोहन कपूर आणि ऊत्विका ग•s यांचा सामना इंग्लंडच्या ग्रेगरी मायर्स आणि जेनी मायर्सशी होईल.









