वृत्तसंस्था/ माउंट कार्बन
अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून यात गनमॅनसह 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गोळी लागल्याने अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पश्चिम वर्जीनियाच्या माउंट कार्बन येथे ही घडली आहे. गोळीबारामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण दिसून आले. तर पोलिसांनी लोकांना घरातून बाहेर न पडण्याचा आदेश दिला होता.
गोळीबार करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी पाठलाग केला असता त्याचा मृतदेह घरात आढळून आला. त्यालाही गोळी लागली होती. आरोपीने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. याचबरोबर आणखी एका इसमाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला असल्याचे पोलीस अधिकारी जेस मॅकमुलेन यांनी सांगितले आहे. घटनास्थळी अन्य तीन जणांना गोळी लागली होती, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही तसेच या घटनेमागील कारणही समोर आलेले नाही असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.









