सिएटल :
अमेरिकेतील सिएटलमध्ये गोळीबाराची घटना घडली असून यायत किमान 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांना 20 वर्षीय युवती आणि युवक जखमी अवस्थेत आढळून आले असून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलीस या घटनेचा तपास करत असताना त्यांना आणखी एक इसम गोळ्या लागून जखमी झालेला दिसून आला. या इसमाच्या वाहनावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तसेच आणखी एका व्यक्तीच्या पायाला गोळी लागली होती. या चारही जणांना पोलिसांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तर गोळीबार करणारा संशयित आरोपी पळाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.









