मुंबई :
सहसंस्थापक गंगवाल यांच्याकडून हिस्सेदारी विक्री होण्याच्या बातमीचा परिणाम इंडिगो एअरलाईनवर (इंटरग्लोब एव्हीएशन) बुधवारी शेअरबाजारात पहायला मिळाला. बीएसईवर बुधवारी इंट्राडे दरम्यान समभाग 5टक्के इतका घसरत 2425 रुपयांवर खाली आला होता. इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल 3730 कोटी रुपयांचे कंपनीतील समभाग विक्री करणार आहेत. कंपनीतील कुटुंबियांची हिस्सेदारी कमी करण्याचा इरादा गंगवाल यांनी बोलून दाखवला आहे.