कोलकात्ता : पश्चिम बंगालमधून कोलकात्याकडं जाणाऱ्या विमानात बिघाड झाल्याने इंडिगोच्या विमानाचं (6E-757) उड्डाण रद्द करण्यात आलं. उड्डाणाच्या तयारीत असताना रनवेवर जाताना विमानाचे चाक घसरले आणि थेट रनवेबाहेर चिखलात रुतलं. या दुर्घटनेत कोणतंही नुकसान झालेलं नाही. हे विमान आसाममधील जोरहाटहून कोलकात्याकडं निघालं होतं. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने ट्विट करत दिली आहे.
या ट्विटमध्ये घसरलेल्या विमानाचा फोटो अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये विमानाची दोन्ही चाकं चिखलात रुतलेली दिसत आहेत. इंडिगोला टॅग करताना त्यानं म्हटलं की, गुवाहाटी कोलकाता इंडिगो विमान रनवेवरुन घसरलं आणि आसाममधील जोरहाट विमानतळावर चिखलातील मैदानात फसलं. या विमानाचं दुपारी २.२० वाजता उड्डाण होणार होतं. पण या घटनेनंतर विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आहे. विमानात ९८ प्रवाशी उपस्थित होते. सर्व प्रवाशी विमानातून उतरले आणि सुरक्षित होते.
Previous Articleडेंग्यूमुळे प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ
Next Article बजरंग पाटील, सर्जेराव पाटील, शिंपी स्पर्धेतून बाहेर









