नवी दिल्ली :
दिल्लीहून वाराणसी येथे जात असलेल्या इंडिगोच्या विमानात प्रवाशांना समस्येला तोंड द्यावे लागले. लोकांच्या तक्रारीनंतर इंडिगो एअरलाइन्सला स्वत:च्या चुकीची जाणीव झाली आणि कंपनीने प्रवाशांची माफी मागितली आहे. विमानाच्या एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. याप्रकरणी इंडिगोने शनिवारी माफी मागितली आहे. एसी योग्यप्रकारे काम करत होता, परंतु तापमानात बदल झाल्याने केबिनच्या तापमानात चढ-उतार झाला आणि यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तरीही आम्ही 5 सप्टेंबर रोजीच्या उ•ाणादरम्यान झालेल्या असुविधेसाठी खेद व्यक्त करतो असे कंपनीने म्हटले आहे.









