वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या आशियाई महिलांच्या हँडबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेतील झोलेल्या प्राथमिक साखळी सामन्यात यजमान भारताने सिंगापूरचा 35-22 अशा फरकाने पराभव केला. आता या स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी मंगळवारी होणाऱ्या प्ले ऑफ सामन्यात भारताची गाठ चीनबरोबर होईल.
भारत आणि सिंगापूर यांच्यातील हा सामना एकतर्फी झाला. मध्यंतरापर्यंत भारताने सिंगापूरवर 9-6 अशी आघाडी घेतली होती. भारतीय संघातील मेनिका आणि भावना शर्मा यांचा खेळ दर्जेदार झाला. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताने हाँगकाँगचे आव्हान 31-28 असे संपुष्टात आणले होते. सिंगापूर विरुद्धच्या सामन्यात भारताच्या नीना शीलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले









