वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडोनेशियातील जकार्ता येथे खेळविण्यात आलेल्या 23 वर्षांखालील वयोगटातील पहिल्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात भारताने यजमान इंडोनेशियाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात नोंदविले गेलेले तीन गोल खेळाच्या पूवाधार्त झाले. भारतातर्फे सुहेल अहमद भट्टने 5 व्या आणि 26 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. तर इंडोनेशियातर्फे एकमेव गोल मध्यंतराला 4 मिनिटे बाकी असताना डॉनी पेमुंगकेसने केला. आता उभय संघातील दुसरा मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना सोमवार 13 ऑक्टोबर रोजी खेळविला जाणार आहे.









