वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने चार देशांचा युरोपीय समूह ईएफटीएसोबत वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीत परस्पर व्यापाराला चालना देण्याच्या उद्देशाने रविवारी एका मुक्त व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी केली आहे. या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 7 मार्च रोजी मंजुरी मिळाली होती.
या करारानंतर भारत आणि ईएफटीएमध्ये सामील चार देश आइसलँड, लाइकेस्टाइन, नॉर्वे आणि स्वीत्झर्लंडसोबत वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. भारत-ईएफटीए व्यापार कराराच्या बैठकीचे अध्यक्षत्व केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केले आहे.
4 देशांची युरोपीय संघटना ईएफटीए देशांसोबत भारताची वाढती गुंतवणूक आणि व्यापाराचा उल्लेख करत गोयल यांनी वाढता व्यापार आणि गुंतवणुकीमुळे आम्हाला विश्वास आणि महत्त्वाकांक्षेच्या एका नव्या पातळीवर पोहोचले असल्याचे नमूद केले आहे.
डिजिटल व्यापार, बँकिंग आणि वित्तीय सेवा, परिवहन आणि रसद, औद्योगिक यंत्रसामग्री, जैव तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासात ईएफटीएफ देशांचे जागतिक नेतृत्व करत आहे. ईएफटीएफ आणि भारतादरम्यान फार्मास्यूटिकल्स, रसायन, अन्नप्रक्रिया आणि स्वच्छ ऊर्जा सहकार्याचे नवे द्वार खुले होणार आहे. भारत ईएफटीएफ देशांना शक्य ते सर्व सहाय्य करणार आहे. उद्योग आणि व्यवसायांना प्रतिबद्ध लक्ष्यांना प्राप्त करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.
युरोपीय मुक्त व्यापार संघासोबत व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करणे सुमारे 15 वर्षांच्या कठोर मेहनतीचे प्रतीक असल्याचे गोयल यांनी सांगितले आहे.
भारत आणि ईएफटीए आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी जानेवारी-2008 पासून अधिकृत स्वरुपात व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर (टीईपीए) चर्चा करत आहेत. या करारात 14 मुद्दे सामील आहेत. यात वस्तूंचा व्यापार, उत्पादनाचे नियम, बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर), सेवा व्यापार, गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सहकार्य, सरकारी खरेदी, व्यापार सुविधा सामील आहे.









