इस्माची माहिती : निर्यात तब्बल 86 लाख टनाच्या घरात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची साखर निर्यात ही मे महिन्यांपर्यंत 86 लाख टन इतकी विक्रमी स्तरावर नोंदली गेली असल्याची माहिती आहे. भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक व दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे, अशी माहिती भारतीय साखर कारखाना संघ (इस्मा) यांनी दिली आहे.
भारताने व्यापारी वर्ष 2020-21 मध्ये एकूण 70 लाख टन साखर निर्यात केली होती, ज्यामध्ये सध्याच्या कालावधीत देशातील उत्पादन तीन कोटी 11.9 लाख टन राहिले होते. मागील महिन्यात सरकारने पर्याप्त देशातील पुरवठा निश्चित केल्यानंतर आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबरमधील सणांच्या सत्राच्या दरम्यान किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साखर निर्यातीला एक कोटी टनवर स्थिर केले होते. यामध्ये सहकारी समित्यांच्या निर्यातीची मर्यादा 10 लाख टनाने वाढविण्याची मागणी केली आहे.
इस्माच्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास 94-95 लाख टन साखर निर्यातीचे कंत्राट निश्चित केले आहे. यामध्ये जवळपास 86 लाख टन साखर मे 2022 पर्यंत निर्यात करण्याच्या सुचना दिल्या आहेत. चालू व्यापारी वर्ष ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान देशातील बाजारात जवळपास 1.6 कोटी टन साखरेची विक्री होण्याचा अंदाज आहे.