60 हजार क्विंटल वजन, 750 किमी पर्यंत क्षेपणास्त्र मारक क्षमता
वृत्तसंस्था/विशाखापट्टणम
भारताची दुसरी आण्विक पाणबुडी अरिघात सज्ज झाली असून ती गुरुवार, 29 ऑगस्ट रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली जाऊ शकते. 2017 मध्ये ‘अरिघात’ची निर्मिती पूर्ण झाल्यापासून तिची चाचणी सुरूच होती. आता अखेर ते कार्यान्वित होणार आहे. अरिघात ही आयएनएस अरिहंतची अपग्रेडेड आवृत्ती आहे. विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या जहाज बांधणी केंद्रात त्याची रचना पूर्ण करण्यात आली आहे. अरिहंत प्रमाणेच अरिघात देखील 750 किमी पल्ल्याच्या के-15 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असेल. या पाणबुडीचे वजन 6 हजार टन (60 हजार क्विटल) इतके आहे. भारतीय नौदलाने आतापर्यंत 3 आण्विक पाणबुड्या तयार केल्या आहेत. यापैकी पहिली अरिहंत कार्यान्वित झाली असून दुसरी अरिघातही सज्ज झाली आहे. तिसऱ्या युद्धनौकेच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. या पाणबुड्यांद्वारे शत्रू देशांवर आण्विक क्षेपणास्त्रे डागता येतात.









