आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी : मलेशिया, कोरिया विजयी, पाक पराभूत
वृत्तसंस्था /चेन्नई
तीनवेळचे चॅम्पियन्स व यजमान भारतानो आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेची विजयाने सुरुवात करताना चीनवर दणदणीत विजय मिळविला. अन्य सामन्यात मलेशियाने पाकला धक्का दिला तर कोरियाने जपानला हरविले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग (5 व 8 वे मिनिट), वरुण कुमार (19 व 30 वे मिनिट) यांनी पेनल्टी कॉर्नर्सवर प्रत्येकी 2 तर सुखजीत सिंग 815 वे मिनिट), आकाशदीप सिंग (16 वे मिनिट), मनदीप सिंग (40 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. चीनचे दोन गोल वेनहुई ई (18 वे मिनिट), जीशेंग गाओ (25 वे मिनिट) यांनी नोंदवले. शुक्रवारी भारताचा सामना जपानविरुद्ध होणार आहे. अन्य लढतीत मलेशियाने पाकला 3-0 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला तर कोरियाने जपानवर 2-1 अशा गोलफरकाने मात केली.
आजचे सामने -1) कोरिया वि. पाक, दु. 4 वा., 2) मलेशिया वि. चीन, सायं. 6.15 वा., 3) भारत वि. जपान, रात्री 8.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 एचडी, फॅनकोड.









