नवी दिल्ली
भारतीय नौदल एप्रिल महिन्यात आफ्रिकेतील 10 देशांसोबत एकत्रित विशाल युद्धाभ्यास करणार आहे. आफ्रिका खंडासोबत संरक्षण सहकार्य वाढविणे हा यामागील उद्देश असणार आहे. भारतीय नौदल आणि टांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्स संयुक्तपणे या युद्धाभ्यासाला आयोजित करणार असून याला आफ्रिका-इंडिया मेरीटाइम एंगेजमेंट नाव देण्यात आले असल्याची माहिती नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल तरुण सोबती यांनी दिली आहे. हा युद्धाभ्यास टांझानियाच्या दार-एस-सलामनजीक समुद्रात पार पडणार आहे. यात कोमोरोस, जिबूती, इरिट्रिया, केनिया, मादागास्कर, मॉरिशस, मोझाम्बि, सेशेल्स आणि दक्षिण आफ्रिकेसह 10 देश सामील होणार आहेत.









