फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारामुळे पंतप्रधानांचे प्रदेश भाजपतर्फे अभिनंदन
प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाचा धडाका, त्यांची एकूणच राजकीय वाटचाल आणि जगभरातील विविध देशात वाजविलेला भारताचा डंका, हे सर्व पाहता भारताची वाटचाल विश्वगुरू बनण्याच्या दिशेने चालली असल्याचा पुरावा आहे, असे मत भाजप प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी व्यक्त केले.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांची उपस्थिती होती. 2014 मध्ये पंतप्रधानपदी आऊढ झाल्यापासून आजपर्यंत मोदी यांना नाईल ईजिप्त, भूतान, संयुक्त अमेरिका, रशिया, बर्लिन, मालदिव, पेलेस्टाईन, अफगाणीस्तान, सौदी अरेबिया, यासारख्या अनेक देशांनी गौरविले आहे. यावरून जगभरातील असंख्य देशांनी मोदी यांचे नेतृत्व मानून घेतले आहे हेच सिद्ध होते. आता हल्लीच म्हणजे दि. 13 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स देशास भेट दिली. त्यावेळी तेथील सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. एखाद्या भारतीय पंतप्रधानांना अशाप्रकारचा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ असून प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचा गोवा भाजपलाही अभिमान वाटत आहे, असे नाईक म्हणाले.
मोदी यांचे गोव्याकडेही खास लक्ष आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. त्यांच्या या प्रेमातूनच आजपर्यंत गोव्याला खूप काही मिळाले आहे. पेंद्र सरकार जे धोरण कार्यवाहीत आणते त्याचे प्रतिबिंब अन्य राज्यांसह गोव्यातही दिसून येते. आरोग्य, पर्यटन, रोजगार, याशिवाय अनेक योजना, प्रकल्प, अन्य उपक्रम यामुळे गोव्याची अर्थव्यवस्था सुदृढ होण्यास मदत झाली आहे. त्यातून अधिक चांगले काम करण्यास आमचेही मनोबल वाढणार आहे. आता तर त्यांनी राज्यात युनिटी मॉल उभारण्यासाठी 100 कोटी ऊपये मंजूर केले आहेत. या आत्मियतेसाठी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करत आहोत, असे नाईक यांनी पुढे सांगितले.
श्री. कुंकळकर यांनी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात डिजीटल अर्थव्यवस्था आणण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून त्याच पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही गोव्यात कॅशलेस पेमेंट पद्धती अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून पेटीएम कंपनीकडे सामंजस्य करार केला. अशाप्रकारे प्रशासन सुटसुटीत करण्याचे त्यांचे प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत, असे सांगितले.
2019मध्ये चांद्रयान-2 च्या अपयशामुळे खचून न जाता अधिक जोमाने प्रयत्न करा, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी भारतीय अंतराळ संस्थेतील शास्त्रज्ञांचे मनोबल उंचावले. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञ प्रचंड उत्साहाने कामाला लागले व त्यांनी मागील सर्व त्रुटी भरून काढत चांद्रयान-3 ची निर्मिती करून त्याचे यशस्वी प्रक्षेपणही केले. या यशस्वी प्रक्षेपणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान अधिक वाढले आहे. या अवकाश तंत्रज्ञानामुळे केवळ अंतराळाचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचाही फायदा होणार आहे. म्हणूनच हे मिशन महत्त्वाचे आहे. या यशासाठी गोवा भाजपतर्फे इस्रो शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत असल्याचे कुंकळकर यांनी सांगितले.









