वृत्तसंस्था/ मुंबई
डोहा कतार येथे रविवारपासून सुरू झालेल्या आशियाई रग्बी डिव्हिजन 2 स्पर्धेत विकास खत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय रग्बी संघाचे सामने कतार आणि कझाकस्तान यांच्याबरोबर होणार आहेत.
ही स्पर्धा 30 एप्रिल ते 6 मे दरम्यान खेळवली जात असून तीन संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने सामने होणार आहेत. भारतीय रग्बी संघाचे नेतृत्व विकास खत्रीकडे तर उपकर्णधारपद प्रिन्स खत्री करित आहे.









