वृत्तसंस्था/नवी दिल्ली
हैद्राबादमध्ये 2 ते 10 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या इंटर कॉन्टीनेंटल चषक 2024 च्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघ सहभागी होणार आहे. मात्र या स्पर्धेत भारताला सिरीया आणि मॉरिशस यांच्याशी लढत द्यावी लागेल.
गेल्यावेळी झालेल्या इंटर कॉन्टीनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेत भारतासह चार देशांचा प्रत्येकवेळच्या या स्पर्धेत समावेश होता. सदर स्पर्धा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये केनिया, न्यूझीलंड, चीन तैपेयी, उत्तर कोरिया, ताजिकस्थान, सिरीया, लेबेनॉन, व्हेनुटू आणि मंगोलिया यांनी आपला सहभाग दर्शविला होता. पण यावेळी ही स्पर्धा तिरंगी राहिल. या तिरंगी स्पर्धेत यजमान भारत, सिरीया आणि मॉरिशस यांचा समावेश आहे.









