जून महिन्यातील स्थितीवर एस अॅण्ड पीचा अहवालातून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा उत्पादनाचा मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) निर्देशांक जून महिन्यामध्ये काहीसा कमी राहिला असल्याचा अहवाल एस अॅड पी यांच्या माहितीमधून देण्यात आला आहे. यामध्ये भारताचा पीएमआयमध्ये घसरण ही 58.7 वरून जूनमध्ये 57.8 वर आला. देशांतर्गत आणि विदेशी मागणीमुळे तेजी आल्याचेही एका खासगी सर्वेक्षणात म्हटले आहे.
पीएमआयच्या भाषेत, 50 वरील संख्या म्हणजे विस्तार, तर 50 पेक्षा कमी पातळी आकुंचन दर्शवते. डिसेंबर 2022 मध्ये पीएमआय 57.8 नोंदवला गेला.क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या म्हणण्यानुसार, वाढत्या मागणीचा पीएमआयला आधार मिळाला आहे. उत्तम विक्री, उत्पादन, कच्च्या मालाच्या साठ्यात वाढ, रोजगार इत्यादींचाही यामध्ये वाटा राहिला आहे. नवीन ऑर्डर्समुळे जूनमध्ये उत्पादन कार्यात झपाट्याने वाढ झाल्याची नोंद आहे.
एसअँड पीचे ग्लोबल मार्केट इंटेलिजेंस असोसिएट डायरेक्टर पॉलीआना डी लिमा म्हणाले, ‘जूनचा पीएमआय डाटा पुन्हा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील उत्पादित वस्तूंच्या मागणीकडे निर्देश करतो.’ ‘कच्च्या मालाच्या खरेदीत झालेली वाढ उत्पादकांमधील आशावाद आणि सकारात्मक वृत्ती दर्शवते. किंबहुना त्यांनी बाजारातील अनुकूल परिस्थितीचे भांडवल केले आणि उत्पादन वाढीला पाठिंबा देण्यासाठी संसाधने सुरक्षित केली असल्याचेही डेलीमा म्हणाले आहेत.









