वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या ताज्या वनडे मानांकनात भारतीय संघाने आपले आघाडीचे स्थान न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पराभवानंतरही शाबूत राखले आहे. या मानांकन यादीत न्यूझीलंडने चौथ्या स्थानावर झेप घेतली.
या मानांकन यादीत भारताने 19 सामन्यातून 129 मानांकन गुण घेत पहिले, इंग्लंड 18 सामन्यातून 125 गुण घेत दुसरे, ऑस्ट्रेलिया 18 सामन्यातून 120 गुणासह तिसरे, न्यूझीलंड 16 सामन्यातून 120 गुणासह चौथे, बांगलादेश 18 सामन्यातून 120 गुणासह पाचवे स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडने अलीकडेच वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा सात गडय़ांनी दणदणीत पराभव केला होता. आयसीसीच्या पुरुषांच्या विश्वचषक सुपर लिग मानांकनात सामना जिंकणाऱया प्रत्येक संघाला 10 गुण तर सामना रद्द किंवा टाय झाल्यास प्रत्येक संघाला 5 गुण दिले जात आहेत. 2023 साली भारतात होणाऱया आयसीसीच्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी या मानांकनातील पहिल्या 8 संघांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे.









