क्रीडा वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अर्जेंटिनाच्या रोसारिया येथे 25 मेपासून होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची 24 सदस्यिय कनिष्ट महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारत, अर्जेंटिना, उरुग्वे, आणि चिली हे चार देश सहभागी होणार आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या कनिष्ट महिला विश्वचषकाच्या पूर्वे तयारी म्हणून राष्ट्रीयस्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय संघाची सहभागी देशांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेकरीता भारतकडून 24 कनिष्ट महिलांची निवड करण्यात आली आहे. डिफेन्सिव्ह युनिटमध्ये ममिता ओराम, लालथंतलुआंगी, मनीषा, पूजा साहू, पार्वती टोप्नो, नंदिनी आणि साक्षी शुक्ला यांचा सामवेश आहे. तर मिडफिल्डमध्ये प्रियांका यादव, अनिषा साहू ,रजनी केरकेट्टा, बिनिमा धन, खैदेम शिलेमा चानू, संजना होरो, सुप्रिया कुजूर, प्रियांका डोग्रा, हुदा खान आणि मुनमुनी दास यांचा समावेश आहे. स्टँडबाय व मिडफिल्डर म्हणून सूचीबद्ध असतील. फॉरवर्ड लाईनमध्ये हिनाबानो, सोनम, सुखवीर कौर, गीता यादव, लालरिपुई, कनिका सिवाच आणि करमनप्रीत कौर यांचा समावेश आहे. सेलेस्टिना होरो आणि विद्याश्री व्ही. यांना स्टँडबाय फॉरवर्ड म्हणून निवडण्यात आले आहे. निधी व एंजिल हर्षा, राणी मिंझ गोलकीपर तर उपकर्णधारपदी हिना बानो यांची निवड करण्यात आली आहे.









