वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2023-24 या कालावधीत भारताचा आर्थिक विकासदर (जीडीपी) 6.3 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, जो अगोदर निश्चित केलेल्या 6.6 टक्के या अंदाजापेक्षा कमी राहणार असल्याची माहिती जागतिक बँकेने आपल्या एका अहवालामध्ये दिली आहे.
जागतिक बँकेने भारताच्या जीडीपी वाढीच्या या अंदाजामध्ये म्हटले आहे, की वाढत असलेली मंदीसदृश्य स्थिती, बाह्या चिंता वाढवणारी परिस्थिती आव्हानात्मक असल्याच्या कारणास्तव विकासाला अडथळा येऊ शकतो असेही यावेळी बँकेने अहवालात म्हटले आहे. तसेच उत्पादनातील मंदी स्थिती व कर्जाची वाढत जाणारी किंमत यांचा खासगी वापराच्या वाढीवर परिणाम होणार असल्याचेही नमूद केले आहे. महामारी संबंधीत असणारे आर्थिक सहाय्य उपाय मागे घेतल्यामुळे, सरकारी वापराचा वेगदेखील मंदावण्याचे संकेत व्यक्त केले आहेत. यावेळी चालू खात्यामधील तूट ही 2023ते 24 या दरम्यान तीन टक्क्यांवरुन 2.1 टक्केवर येणार असल्याचेही यावेळी जागतिक बँकेने म्हटले आहे.









