नवी दिल्ली
भारताचा जीडीपी विकास दर सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये 6 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज एस अॅन्ड पी ग्लोबल रेटिंग्स यांनी व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची गती धिमी होणार असून मान्सूनदेखील अपेक्षे इतका न झाल्यामुळे वरील अंदाज संस्थेने वर्तविला आहे. दुसरीकडे व्याजदर वाढीचा परिणामही आगामी काळामध्ये दिसणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील रेटिंग एजन्सीच्या मते भारतात किरकोळ महागाई दर 5 टक्याऐवजी 5.5 टक्के इतका राहणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये विकास दर 2022-23 आर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी राहणार असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 6.9 टक्के विकास दर राहणार असल्याचेही भाकित संस्थेने केले आहे.









