केसरी -फणसवडेत सुरु होणार के . एस .आर ग्लोबल ॲक्वेरिअम
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यात भारतातील पहिले फिश ॲक्वेरिअम फिश थीम पार्क केसरी- फणसवडे येथे के. एस . आर. ग्लोबल ॲक्वेरिअम यांच्यामार्फत सुरू होत आहे. या फिश थीम पार्कचे भव्य दिव्य उद्घाटन उद्या 11 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री दत्तात्रय चव्हाण आणि सौ शुभांगिनी चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत . सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असून या पर्यटन जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र वाढीच्या दृष्टीने फिश थीम पार्क च्या माध्यमातून देशी विदेशी पर्यटक या भागात वळावे या दृष्टीने केंद्राच्या मच्छसंपदा योजनेअंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे . शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता याचा फायदाही होणार आहे . दुसऱ्या टप्प्यात परदेशातील टनेल्स ची सुरुवात करण्यात येणार आहे. या एक्वेरियममध्ये एकत्र पक्षी पाहण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे. तर या उद्घाटनाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.









