आर्थिक वर्षासाठी आशियाई विकास बँकेचा अंदाज
नवी दिल्ली
: चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धीचा दर हा 6.4 टक्क्यांवर आणि आगामी आर्थिक वर्षांसाठी 6.7 टक्क्यांवर कायम राहणार असल्याचे भाकीत आशियाई विकास बँक (एडीबी) यांनी आपल्या अहवालामधून केले आहे. देशातील मजबूत मागणीमुळे अर्थव्यवस्थेला नवीन उंची प्राप्त करण्यास मोठी मदत होणार असल्याचेही एडीबीने सांगितले आहे.
एडीबीच्या एशियन डेव्हलपमेंट आउटलूकमधील उपलब्ध माहितीनुसार इंधन आणि खाद्याच्या किंमती घटल्याच्या कारणास्तव महागाई दरात घसरण कायम राहणार असल्याच्या शक्यतेमुळे अर्थव्यवस्थेला सकारात्मक परिणामाचा लाभ पहावयास मिळाला असल्याचेही यावेळी अहवालात म्हटले आहे.
एडीबीचे मुख्य अर्थशास्त्री अल्बर्ट पार्क यांनी म्हटले आहे, आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील महामारी व त्यामधून सावरत असणारी अर्थव्यवस्था तसेच चलन वाढ व तेलाच्या उच्चांकी किंमतीमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर घटवला होता.









