वृत्तसंस्था/ डेलियान (चीन)
रविवारी येथे झालेल्या आशियाई सांघिक स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांकडून साफ निराशा झाली. पुरुष विभागात भारताने सहावे स्थान तर महिलांच्या विभागात पाचवे स्थान मिळविले.
महिलांच्या विभागातील पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत भारताने इराणचा 2-0 असा पराभव केला. तर पुरुषांच्या विभागातील पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत दक्षिण कोरियाचे भारताचा 2-1 असा पराभव केल्याने भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.









