वृत्तसंस्था/बीएल (स्वित्झर्लंड)
एका धाडसी खेळीत भारताने आज शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या बलाढ्या यजमान स्वित्झर्लंडविऊद्धच्या वर्ल्ड ग्रुप 1 इनडोअर लढतीसाठी तऊण धकिष्णेश्वर सुरेश आणि पुनरागमन करणारा खेळाडू सुमित नागलला रिंगणामध्ये उतरविले आहे. डेव्हिस कप पात्रता फेरीत स्थान मिळविण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. कर्णधार रोहित राजपालने धकिष्णेश्वरला या लढतीसाठी स्वित्झर्लंडला जाऊ देण्याच्या दृष्टीने त्याच्या अमेरिकेतील प्रशिक्षकांचे मन वळविले आणि 6 फूट 5 इंच उंचीच्या मदुराईमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने प्रशिक्षण आठवड्यात उत्कृष्ट कामगिरी करून चांगला प्रतिसाद दिला. इनडोअर कोर्टवर फ्लॅट हिटिंग आणि मोठी सर्व्हिस महत्त्वाची असते आणि धकिष्णेश्वरकडे ही दोन्ही कौशल्ये आहेत. यामुळे नॉन-प्लेइंग कर्णधाराला सहजपणे खात्री पटली की, तो एकेरीतील दुसरा खेळाडू म्हणून अधिक योग्य ठरेल. धकिष्णेश्वर (क्रमांक 626) जागतिक क्रमवारीत 155 व्या क्रमांकावर असलेल्या जेरोम किमविऊद्धच्या लढतीने सुऊवात करेल. आम्ही कामगिरीच्या आधारे निर्णय घेत आहोत, त्यात काहीही विचित्र नाही, असे राजपालने सांगितले. सप्टेंबर, 2023 मध्ये लखनौ येथे झालेल्या मोरोक्कोविऊद्धच्या घरच्या सामन्यानंतर नागल डेव्हिस कपमध्ये परतत आहे.









