वृत्तसंस्था/ नागपूर
नागपूर खुल्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. डब्ल्यू 35 नागपूर खुल्या आयटीएफ महिलांच्या टेनिस स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या सहजा यमलापल्लीचे एकेरीत तर श्रीवल्ली भामीदिपती आणि वैदेही चौधरी यांचे आव्हान दुहेरीमध्ये समाप्त झाले.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बिगर मानांकित देयॉन बॅकने सहजा यमलापल्लीचा 6-4, 6-1 असा पराभव केला. महिला दुहेरीत श्रीवल्ली व वैदेही यांना लिथुआनियाच्या जस्टिना मिकुलस्काईट व कोरियाची येओनवू यांच्याकडून 6-2, 2-6, 10-8 असा पराभव स्वीकारावा लागला.









